मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, यूपीची टक्कर आणि चक्कर राजकारणात खूप महत्त्वाचे आहे. योगीजींनी गोरखपूरमधून लढावे की अयोध्येतून लढावे. तो त्यांचा हक्क आहे, पण देशात अराजक माजले, मृतदेह गंगेत वाहताना दिसले. हे पाहून जिवंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत.
हे देखील वाचा :
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची अपेक्षा
यासोबतच संजय राऊत यांनी अखिलेश यादव यांना मोठा सल्ला देत तुम्ही निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा, असे म्हटले आहे. अखिलेश यादव यांनाही सर्वांना सोबत घेऊन ही लढाई लढावी लागणार आहे. ते म्हणाले की, अहंकार सर्वांना बुडवतो. उत्तर प्रदेशातील जनता अखिलेश यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.