जळगाव | जळगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात धुणी, भांडी घासण्याचे काम करणाऱ्या मोलकरणीवर एका वकिलाने अत्याचार केले. तिचे आपत्तीजनक फोटो व्हायरल करून बदनामी केली. अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेऊन वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.
राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) असे या वकिलाचे नाव आहे. पीडित महिला गवईच्या घरी मोलकरणी म्हणून काम करीत होती. या दरम्यान त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.