मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना खुशखबर दिली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एमपीएससीच्या संकेतस्थळावर आजपासून 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करता येईल.
पदे आणि पदसंख्या
१. उद्योग निरिक्षक (गट क) – 103 पदे
२. दुय्यम निरिक्षक (गट क)- 114 पदे
३. तांत्रिक सहाय्यक (गट क) – 14 पदे
४. कर सहाय्यक (गट क) – 117 पदे
५. लिपिक-टंकलेखक (मराठी) – 473 पदे
६. लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) – 79 पदे
पात्रता-
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
या सर्व पदांसाठी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परीक्षा होईल. तदनंतर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा ( गट क ) 2021 परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. उमेदवारांनी अधिक तपशीला साठी https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर भेट द्यावी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

