जळगाव प्रतिनिधी | शहरातील मेहरूण येथील पवन उर्फ घातक मुकंदा सोनवणे या तरूणावर शनिवारी रात्री प्राणघात हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मेहरूणमधील पवन सोनवणे या तरूणावर रात्री दोघांनी तलवाीसह धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात जखमी झाल्याने त्याला रात्री उशीरा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पवनवर सागर खंडारे आणि दीपक सपकाळे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.