महाराष्ट्रावर अनेक नैसर्गिक संकटं आली, महिलांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत, यावर मुख्यमंत्री बोलणार की नाही ? राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य राहिलेले नाही. आज दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या आणि भाजपाच्या नावाने जितका करता येईल तितका’शिमगा’केला असल्याचं ट्विट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका करत विरोधकांवर तोफ डागली.केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होतं असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला असून केंद्र सरकार,केंद्रीय मंत्री रामनाथ सिहं, RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला होता त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीला जाब विचारला आहे.