जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । गणेशोत्सवात हद्दपार असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी घरातून मुसक्या आवळल्या. विशाल राजू अहिरे असे या आरोपीचे नाव त्याला रामेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाने विशाल अहिरे या गुन्हेगाराला हद्दपार केले होते. दरम्यान संशयित आरोपी विशाल आहिरे हा शनिवारी 18 सप्टेंबर रोजी रामेश्वर कॉलोनीत आला असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील, सतीश गर्जे, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हद्दपार असलेला आरोपी विशाल अहिरे चौक अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एमआयडीसी पोलिस करण्यासाठी करत आहे.