मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी कायम असल्या तरी दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग १३ व्या दिवशी देशभरात इंधन दर स्थिर आहेत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत तूर्त पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास राज्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे इंधन स्वस्त होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे.