पारोळा प्रतिनिधी | एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव या तालुक्यांसह जळगांव जिल्ह्यात कापसावर लाल्या रोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच ज्वारी व मका या पिकांवरदेखील अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
या काळात बळीराजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून कपाशीवरील लाल्या रोगासह बोंडअळी, तर ज्वारी आणि मका या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून, शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना साकडे घातले असून, दखल घेण्याची विनंती केली आहे.