पाचोरा-(प्रतिनिधी)- पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा या विद्यालायात दहावी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी जयदीप नवल पाटील याने पुणे येथे अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची M.S.या उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील बोस्टन विद्यापीठात निवड झालेली आहे. तो ग.स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष श्री. नवल पितांबर पाटील यांचा मुलगा आहे.
संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा. नानासाहेब व्ही..टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन मा.दादासाहेब श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समिती चेअरमन मा.आण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, मुख्याध्यापक श्री.सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ, पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील, श्री.एन. आर.ठाकरे, श्री.ए.बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख श्री. मनीष बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस पाटील, भडगाव येथील श्रीमती माया देशमुख व श्री. विजय भोसले हे उपस्थित होते. मान्यवरांनी त्याच्या यशाबद्दल कौतुक केले व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.