रावेर ( प्रतिनिधी) रावेर न्यायालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोक अदालत व बाल कामगार जनजागृती कार्यक्रमा निमित्त फिरते न्यायालय विवरे बु” येथील ग गो बेंडाळे हायस्कूल परिसरात भरविविण्यात आले. यात ३२ केसेस निकाली काढून १० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या सभागृहात बाल कामगार जनजागृती व लोकअदालत हा कार्यक्रम रावेर सह दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश आर एम लोळगे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे , माजी सरपंच वासुदेव नरवाडे , वकील संघाचे अँड विजय महाजन , सचिव अँड धनराज पाटिल यांनी बाल कामगार विरोधी व न्याय आपले दारात या संदर्भात मार्गदर्शन केले.
राज्य विधी प्राधिकरण अंतर्गत फिरते लोकन्यायलयचे आयोजन करण्यात आले होते.कायदा सर्वासाठी समान आहे. बाल कामगारांत शिक्षणाची उर्जा निर्माण करा, गरीबीमुळे शिक्षण न घेणाऱ्या बालकामगारा कडे समाजाने लक्ष दिले पाहीजे, बाल कामगारामध्ये शिक्षणाचा अभाव दिसुन येत आहे. घरातील एक मुल जरी शिकले. तर पुर्ण कुटूंब शिक्षित होते.असे रावेर सहदिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश आर.एम.लोळगे यांनी प्रतिपादन केले. रावेर वकिल संघाचे अध्यक्ष अँड जगदिश महाजन,सचिव अँड धनराज पाटील, सहसचिव अँड प्रमोद विचवे,अँड योगेश गजरे , अँड मुक्तार शेख , न्यायलयीन कर्मचारी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक वकील संघाचे सचिव अँड, धनराज पाटील तर सुत्रसंचलन अँड योगेश गजरे यांनी केले.या लोकन्यायलयात एकूण ३२ केसेस निकाली काढण्यात आल्या असुन दहा हजार पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला,
रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे,निंभोरा सपोनि स्वप्नील उन्नवणे, सावदा सपोनि डी डी इंगोले, उपनिरीक्षक निलेश वाघमारे,सरपंच युनुस तडवी,भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, पं.स.सदस्या सौ योगिता वानखेडे, उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल,बाबुराव पाटिल ,ग्रामपंचायत सदस्य सौ स्नेहा पाचपांडे, श्रीमती रेखा गाढे , नौशाद बी इस्माइल खा, सौ ज्योती सपकाळ, संदिप पाटिल , युसुफ खाटिक, दिपक राणे , दिपक गाढे , मनिषा पाचपांडे, पुनम राणे, पोलीस पाटिल योगेश महाजन , पंकज बेंडाळे , मुख्याध्यापक अरूण महाजन यासह अंगणवाडी सेविका, आशावर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते .