रावेर,-(विनोद कोळी)- रावेर येथून तीन किमी.अंतरावर असलेल्या पुनखेडा-पातोंडी येथील भोकर नदी वरील पुलाची श्री.अनिलभाऊ चौधरी यांनी पाहणी केल्या दरम्यान तेथील उपस्थित शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांकांचा पडक्या व प्रलंबित पुलाच्या कामा विषयी अत्यंत संताप चौधरी यांच्यासमोर व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे कि पुनखेडा-पातोंडी रोडवरील पूल सुमारे तीस ते चाळीस वर्षपूर्वी बांधण्यात आलेला होता. नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्या ठिकाणचा भरावं वाहून गेल्याने सदर पूल झुकला असून पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.नदीपत्रातुन तात्पुरता स्वरूपात रस्ता तयार केला असून त्यावरून बस, ट्रक, ट्रॅक्टर, मोटरसायकल, बैलगाडी इ. वाहणांना तारेवरची कसरत करावी लागत असून मोठया अपघातास निमंत्रण आहे.
पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने अचानक पणे जोरात पाऊस पडल्यास नदीला मोठा पूर आल्यास एकमेव रस्ता असल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटू शकतो. त्याचबरोबर केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा यामुळे फटका बसू शकतो सदर पुलावरील पर्यायी रस्त्याच्या आजूबाजूला खड्यामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी कि अधिकारी? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.त्यावर चौधरी यांनी मत व्यक्त करत केवळ रावेर यावल लोकप्रतिनिधी च्या निष्क्रिय कामामुळे विकास रखडलेला असून नागरिकांचे हाल होऊन त्यांना त्रास भोगावं लागत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांसमोर श्री.चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्याशी भ्रमंध्वनीवरून संवाद साधत पुलाचे काम व पर्यायी रस्ता मजबूत करण्यासंदर्भात आश्वासन दिले. व येत्या चार पाच दिवसात कामाची सुरवात न झाल्यास शेतकरी बंधू व ग्रामस्थांनसोबत उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
या वेळी सा. कार्यकर्ते श्री.आनंदभाऊ बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विनोद कोळी (शिवा भाई G), ग्रामपंचायत सदस्य डिगबर बोरसे,प्रवीण चौधरी, गणेश पाटील, चेतन पाटील, कुणाल महाजन ,धिरज सावळे,राकेश घोरफडे,राहुल पाटील,गोविदा धनगर,शभुम पगारे ,मयुर गोसावी व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.