मुक्ताईनगर,(वार्ताहर) – येथील ब-हाणपुर रोड लगत असलेल्या श्री हॉटेल समोर चौघांनी एका महिलेशी वाद घालत असताना त्यांना समजावण्यासाठी आलेल्या वृद्धावर एकाने चाकूने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. दरम्यान यातील चार आरोपींपैकी एक आरोपी फरार असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मुक्ताईनगर येथील सागर ओंकार पाटील वय 32 वर्षे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,. मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात
ब-हाणपुर रोड लगत असलेल्या श्री हॉटेलच्या समोर गोपाळ काठोके यांचे एक छोटेसे दुकान आहे त्या ठिकाणी त्यांची आई शांताबाई काठोके या डबा घेऊन आले असता त्यांच्याशी रमजान खान अयुब खान (रा.गुलाबगंज बऱ्हाणपूर मध्य प्रदेश) , शाहरुख शेख आजम शेख (रा. भुसावळ) , शिवम गोपाल ठाकूर (रा. शिवाजीनगर बऱ्हाणपूर ) तसेच अनिल पहिलवान ( पूर्ण नाव माहीत नाही ) अशा चौघांनी वाद-विवाद केला. त्यामुळे शेजारी मोबाईलचे दुकान असलेल्या सागर ओंकार पाटील (वय 32 वर्षे) व त्याचे वडील ओंकार विठोबा पाटील (वय 60 वर्ष) हे समजावण्यासाठी आले असता त्यांना रमजान खान अयुब खान याने तुम्ही आमच्या वादात पडण्याचे कारण नाही. तुम्ही मध्ये बोलले तर तुम्हाला जीवे ठार मारेल असे म्हणत धमकी देऊन त्याच्या खिशातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी सुद्धा फिर्यादी व त्याचे वडील यांना सापडली त्यांनी मारहाण केली व चाकूने जीवे मारण्याच्या इराद्याने ओंकार विठोबा पाटील यांच्यावर चाकूने वार केले त्यात वृद्ध असलेल्या ओंकार पाटील यांच्या गळ्यावर छातीवर गंभीर जखमा झाल्या.
त्यानंतर यातील संशयित चौघा आरोपींनी एकमेकांना मारहाण करून एकमेकांना दुखापत केली. अशी फिर्याद दाखल केली असून भा द वि 307 324 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती परविन तडवी या करीत आहेत. दरम्यान घटना घटना बरोबर नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या जमावास पांगविले. तसेच जखमी वृद्धास तसेच संशयित आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशन तसेच उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या कालावधीत मात्र चार संशयित आरोपी आणि पैकी तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्यापैकी एक आरोपी फरार झाला आहे.