श्री. प्रवीणसिंग पाटील…
सरजी, आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
जीवनात रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्व दिल्या जाते ते म्हणजे ‘मैत्रीच्या नात्याला’ कारण ते नातंच तसं असतं. जे ठरवून केल्या जात नाही, ते आपसूक निर्माण होतं…
आज आपला वाढदिवस… म्हणून थोडंसं व्यक्त व्हावंसं वाटतंय… आपल्या सारख्या ‘व्रतस्थ’ मित्रासाठी आज व्यक्त व्हायलाच पाहिजे पण… दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस वैगेरे मी म्हणणार नाही, कारण या पलीकडे सुद्धा तुमची मैत्री करण्याची पद्धत आहे… मित्रांच्या सुख दुःखात आस्थेवाईक पणे चौकशी करून सहभागी होणं, ‘मंगल मैत्रीचं’ रूप म्हणजे तुम्हीच…
किती हा गोतावळा,
किती हा निरागस पणा…
तुमच्या मैत्रीत,
नुसताच प्रेमाचा झरा…
‘या’ निःस्वार्थ मैत्रीला
काय म्हणावं…
निसर्गाची शक्ती की,
आमचं भाग्य म्हणावं …
आपल्या वाढदिवशी
एकच मागणं देवाला
सुंदर आयुष्य…
लाभो तुम्हाला….
आपणास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
– प्रविण सपकाळे
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ