रावेर- प्रतिनिधी :-(विनोद कोळी)- विरोधी पक्ष नेते देवेन्द्रफडवणीस हे रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे केळीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आले असताना प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा अंतर्गत शिष्यवृत्ती मिळणेबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात विविध शाखामध्ये लाखो विदयार्थी शिक्षण घेत आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागा अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते. महाराष्ट्रातील गरीब, होतकरू ,निराधार,अल्पभूधारक विदयार्थी हे शिक्षण घेण्यासाठी विविध शहरामध्ये, विविध भागांमध्ये भाड्याने रूम घेऊन राहतात,मेस मध्ये भोजन करतात.सर्वाना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही.अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत समाज कल्याण विभागा मार्फत शिष्यवृत्ती मिळते. परंतु दोन वर्ष झाले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मिळालेली नाही.तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक जाचक अटींमुळे विद्यार्थी वंचित राहत आहे.जर एखादा विद्यार्थी एक विषयात नापास झाला. तरी त्याला ए. टी. के. टी.नुसार पुढील वर्गात वर्षात प्रवेश मिळतो. परंतु त्याला स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही.तसेच पंजाबराव देशमुख विभागां अंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती याची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये आहे.आणि मागासवर्गीयांना विद्यार्थ्यांना मिळणारी समाज कल्याण विभागा अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी २,५०,००० रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे तरी ती वाढविण्यात यावी.
कोट्यावधी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वापरला जातो . शासणाकडे करोडो रुपये राखीव असताना विद्यार्थ्यांना दोन वर्षापासुन त्याचा लाभ मिळालेला नाही. कोरोनामुळे संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजविला असुन रोजगार पुर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तरी आपण विरोधी पक्ष नेते या नात्याने याची दखल घेवून योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा.विद्यार्थ्यांना लाभ न मिळाल्यास संपुर्ण महाराष्ट्राभर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी प्रा. सुनील तायडे,प्रा.हर्षवर्धन भालेराव, कृष्णा सावळे, सचिन सुरवाडे, विनोद ठाकरे, सोनु सूर्यवंशी, कैलास दामोदरे आदी उपस्थित होते