दिलदार अन् संवेदनशिल मनाचे कुशल संघटक
श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष, साई मल्टीपर्पज सर्व्हीसचे संचालक, आमचे पत्रकारमित्र
प्रवीणसिंह पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्त एका दिलदार, अत्यंत हळव्या, संवेदनशिल मनाचे कुशल
संघटक, तितकेच व्यवहार चातुर्य असणारे यशस्वी व्यावसायिक, सर्वांच्या अडचणी समजून घेत व मदतीला तत्पर
धावून येेणारे व प्रेरणादायी प्रवीणसिंह पाटील यांना लाख लाख शुभेच्छा…? पाटील साहेबांनी विद्यार्थी दशेत
असताना चक्क सहा वर्ष एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. परंतु, नोकरीच्या
मागे न धावता त्यांनी स्वत:ची सिक्युरिटी कंपनी स्थापन केली.
एकेकाळी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे
एक तरुण आता एका सिक्युरिटी कंपनीचे मालक बनले असून ते जळगावच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल 26
जिल्ह्यांमध्ये मल्टीपर्पज सर्व्हीस देत आहेत. त्यांनी नोकरी केली असती तर ते आत्मकेंद्री बनून केवळ स्वत:च्या
कुटुंबाचा विचार करू शकले असते.मात्र, आज ते मल्टीपर्पज सर्व्हीसच्या माध्यमातून हजारोंना रोजगार उपलब्ध
करुन देत आहे. ते या सहकार्यांशी एक मालक नव्हे, तर एका उत्तम पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी
आतापर्यंत अनेक गरीब, गरजू रुग्णांना वेळोवेळी मोफत जेवण, औषधोपचाराची सोय करुन दिली.
कोरोनाच्या कालावधीत पितृछत्र हरवलेल्या एका मुलीच्या शैक्षणिक फीसाठी आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक
साहित्य अथवा आर्थिक मदतीचा हात दिला. कोणी अडचणीत, संकटात असल्याचे कळताच त्याला काही मदत
करता येईल, हा विचार करुन ते प्रत्यक्षरित्या सहकार्य करतात. श्री राजपूत करणी सेनेचे कार्य करताना केवळ
राजपूत समाजाला केंद्रीत न करता त्यांनी इतर समाजातील असंख्य कार्यकर्ते जोडले. त्यामुळे ते एक कुशल
संघटक असून अनेकांचे चाहते झाले. या अत्यंत संवेदनशिल मनाच्या व हळव्या स्वभावाचे आमचे प्रेरणास्थान,
मार्गदर्शक पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा…!