मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले होते. परंतु मागील काही दिवसा राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली असून रुग्ण संख्या कमी होतानाचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चैन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला असून त्याचा कालवधी १ जूनला संपत आहे. दरम्यान, यानंतर लॉकडाऊन उठणार की वाढणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असताना राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहे.
त्यामुळे 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू असून राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं सुतोवाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना हे सुतोवाच केलं. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.