मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे
सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल. यामध्ये इयत्ता नववी व इयत्ता दहावी, सुधारित मुल्यमापन धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांवर आधारित असेल. 100 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थी समाधानी नसेल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी मिळतील.
दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष
वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण
दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.