पाचोरा. ता ६ – रोटरी क्लब पाचोरा भडगाव च्या शिष्टमंडळाने आज तारीख ६ रोजी कोल्हे तालुका पाचोरा या गावाला भेट देऊन तेथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चे पदाधिकारी, मराठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व जनतेशी संवाद साधला.
रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष डॉ भूषण मगर यांनी त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात कोल्हे गाव दत्तक घेतले असून या गावात शाळा, शालेय परिसर, जलसंधारण, युवकांचा विकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य, क्रीडा आदी क्षेत्रात कोणत्या प्रकारे विकास कामे करता येतील, या उद्देशाने ही भेट महत्त्वपूर्ण होती. या शिष्टमंडळात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भूषण मगर यांचे समवेत जेष्ठ रोटेरियन डॉ. जवाहर संघवी, चंद्रकांत लोढाया, राजेश मोर,तसेच निलेश कोटेचा, शिवाजी शिंदे यांचा समावेश होता. यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ढोल लेझीम पथकाने शिष्टमंडळाचे स्वागत केले. शिष्टमंडळाने प्रथम बाफना कृषी विद्यालया ला भेट दिली, त्यानंतर जि. प. मराठी शाळा व परिसराची पाहणी केली. तेथे झालेल्या एका समारंभात शिष्टमंडळाने स्थानिक विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी कोल्हे गावा तर्फे शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले, व रोटरीच्या शिष्टमंडळाला विविध विकास कामे तसेच मागण्यांचे निवेदनही ही देण्यात आले. डॉ भूषण मगर यांनी सर्व संभाव्य कामांच्या बाबतीत योग्य तो प्राधान्यक्रम लावून नवीन प्रोजेक्ट राबवून गावाला नवी ओळख देण्याचा संकल्प जाहीर केला. रोटरी क्लब तर्फे राजेश मोर यांनी ग्रामस्थांना रोटरीच्या कार्याची ओळख करून दिली