- बांधकाम कामगारांची नोंदणीसाठी अभूतपूर्व गर्दी
- खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून मेळाव्याचे आयोजन
- चार हजार पेक्षा अधिक कामगार बांधवांची नोंदणी साठी अर्ज दाखल
- बांधकाम कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध -संपदा पाटील यांचे प्रतिपादन
चाळीसगाव – बांधकाम कामगार आपले जीवन सातत्याने कष्टाने व मेहनतीमध्ये व्यतीत करतो दिवस निघाला म्हणजे त्यांना डबा घेऊन कामावर हजर राहावे लागते.अन्यथा प्रपंचाचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न समोर उभा राहतो अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या आयुष्यासह परिवाराकडे दुर्लक्ष होते मात्र शासनाने दिलेल्या 28 योजनांचा लाभ त्यांच्या पदरात पडावा यासाठी आज या बांधकाम कामगार नोंदणी मेळाव्यातून नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या सर्व कामगार बांधवांना शासनाचा सोयीसुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कामगार बांधवांची जीवनमान उंचवावे यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून यापुढेही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही उमंग समाज महिला परिवाराच्या अध्यक्ष संपदा पाटील यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने व कुमावत बेलदार समाज संघ महाराष्ट्र राज्य तसेच भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज सकाळी 11 वाजता भूषण मंगल कार्यालयात बांधकाम कामगार महिला पुरुष मोफत नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपदा पाटील बोलत होत्या व्यासपीठावर कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत परदेशी ,भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी जे पाटील, कामगार कल्याणकारी मंडळाचे श्रीयुत सौदागर ,विजय पाटील तसेच पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्करराव पाटील ,पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील , माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे ,भारतीय मजदूर संघाचे सदाशिव सोनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला योजना विषयी पंचायत समिती उपसभापती संजय पाटील यांनी माहिती दिली, यावेळी संपदा पाटील पुढे म्हणाल्या की खासदार उन्मेष पाटील यांना आपण दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ते विक्रमी मतांनी खासदार झालेत . ते दिल्लीत असले तरी गल्लीतील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांच्याच संकल्पनेतून आज खोदाई कामगार ,गवंडी कामगार, फरशी फिटिंग मजूर ,इलेक्ट्रिशियन ,पेंटिंग काम करणारे मजूर ,फर्निचर व सुतारी काम करणारे कामगार वेल्डिंग काम करणारे कामगार फॅब्रिकेटर्स तसेेेच इतर बंधू-भगिनींना या योजनेेेचे लाभ मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी श्रीकांत परदेशी, संजय पाटील यांनी मानोगत व्यक्त केले. दिनेश बोरसे यांनी उपस्थित हजारो कामगार बांधवांना योजनेच्या अर्जा विषयी माहिती देऊन आभार व्यक्त केले.
सूत्रसंचलन दीपक कुमावत यांनी केलेचार हजार कामगारानी केली नोंदणी
आजच्या मेळाव्यात शहर व तालुक्यातील कामगार बंधू भगिनीनी अभूतपूर्व गर्दी केली होती.आज अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया भूषण मंगल कार्यालयाच्या दोन्ही सभागृहात सुरू होते 28 प्रकारच्या विविध व योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांसह कामगार बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सुमारे चार हजार कामगारांनी आपले नोंदणी अर्ज यावेळी दाखल केले कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी सौदागर यांच्या देखरेखीखाली हे सर्व अर्ज स्वीकारण्यात आले त्यांच्या 9 कर्मचाऱ्यांसह यावेळी सचिन पवार, समाधान राठोड, दिनकर राठोड, रवींद्र पाटील फय्याज शेख गणेश काळे, बाजीराव आहीरे ,वाल्मीक आहिरे ,लियाकत पठाण, दीपक कुमावत , समाकित छाजेड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नागरिकांकडून फॉर्म भरून घेतले. भूषण मंगल कार्यालय परिसराला अक्षरश या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते गेल्या एक-दीड वर्षापासून खासदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्यासह 28 योजनेचे लाभ पदरी पडल्यामुळे आज हजारोच्या संख्येने कामगार बंधू भगिनींनी नोंदणीसाठी गर्दी केली होती.