पाचोरा,(प्रतिनिधी) – राजीव गांधी टाऊन हॉल येथे पाचोरा कोळी समाज बांधव यांच्या कडुन रामायण कार महषीॅ वाल्मिकी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रथम वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उद्या वाढदिवस असल्याने कोळी समाज बांधव यांच्या कडुन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, अॅड शांतीलाल सौदांने, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, सुनील मोरे, राजेंद्र मोरे सर, अनिकेत सुर्यवंशीॅ, अनिल मासरे, ललित सोनवणे, अनिल जाधव सर, ,संजय मासरे, राजेंद्र खैरनार,प्रविण बोरसे, आदी समाज बांधव सह महिला भगीनी उपस्थित होते.