पाचोरा, (प्रतिनिधी)- पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार सातगाव (डोंगरी) गावी खडकी नदिच्या काठी चालू असलेल्या पत्त्याच्या डावावर छापा टाकून 233650/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 6 आरोपींना जागीच पकडून ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर असे की, दि.08/08/2020 रोजी आम्ही स.पो.नि. निता कायटे तसेच पोहेका/2658 रणजित पाटील, पोका/990 संदिप राजपूत,पोका/3217 ज्ञानेश्वर बोडखे, मपोका/2527 माधुरी शिंपी पोलिस स्टेशनला असतांना मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार सातगाव (डोंगरी) गावी खडकी नदिच्या काठी चालू असलेल्या पत्त्याच्या डावावर छापा टाकून 233650/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 6 आरोपींना जागीच पकडून ताब्यात घेण्यात आले.
तसेच नमुद 6 आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपळगाव पोलीस अधिकारी श्रीमती निता कायटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव परिसरात अवैध धंदे वाल्यांचे कदॅन ठरल्याचे बोलले जात आहे,एक विश्वास पात्र पोलीस अधिकारी लाभल्याचे पिंपळगाव ग्रामस्थांनी यावेळी बोलुन दाखवीले आहे