भडगाव – देशातील होणारे मॉब लिंचिंग च्या विरोधात भडगाव शहराच्या मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने तहसिलदार यांना दि. 15 सोमवार रोजी निवेदन देऊन आमच्या भावना महामहिम राष्ट्र्पती यांना पोहचवा असे नम्रपणे अवाहन केले.
निवेदनात म्हटले आहे की,देशात अल्पसंख्यांक समाजावर दिवसेंदिवस होणारे अत्याचार वाढत आहेत.अन्याय, अत्याचार, सैराचार माजला असून यावर देश पातळीवरून प्रतिबंध घालावा असे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतांना इम्रान अली सय्यद उर्फ अंकल, हाजी झाकीर कुरेशी, मुन्सफ खान उर्फ बबू सेट, रिझवान खान, अबरार मिर्झा, अशरफ शेख, ईसहाक मलिक, मझर अली, एतबार खान व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.