शासनकर्ता हा आई-बापा सारखा असेल तर तर तो प्रजेपैकी दीन दूबळ्या विभागा कडे जास्त लक्ष देतो.आणि तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे ,त्यांनाच अधिक लक्ष देतो .आणि जे दुबळे आहेत त्यांना अधिक दुर्बल करतो.पहिला “समता ” प्रस्थापित करतो.तर दुसरा विषमता वाढवतो.
राजर्षी शाहू राजांनी प्रजेत समता निर्माण व्हावी या हेतूने प्रयत्न केला.शाहू राजांनी जातीभेद नाहीसे व्हावेत या साठी कायदे तर केलेच ,पण सर्वोत्परी मदत ही केली.एकदा एका अस्पु्ष्य स्त्री ने स्परूष्यांच्या विहीरीतून घागरभर पाणी काढले.त्या वेळी सवर्ण लोकांनी तिला पाहीले.तिला महाराजां समोर नेले.महाराज तेव्हा सोनतळी येथे होते.महाराज त्या स्री ला रागा रागाने बोलू लागले.त्यांनी आवाज चढवला.बोलता – बोलता त्यांना ठसका लागला.महाराज घाई घाऊ ने बोलू लागले.”पाणी द्या ,पाणी द्या “आणि महाराजांनी त्या स्री च्या घागर मधीलचं पाणी प्याल्यावर म्हणाले,”अरे बाबांनो ,मीच या म्हातारीच्या घागर मधील पाणी प्यालो.काय करू?महाराजांचं “ठसका “हे नाटक होतं.महाराज केव्हा केव्हा नामी युक्ती शोधायचे.
शाहू राजांनी फासे पारधी व तत्सम गुन्हेगार जातींना जवळ केले.त्यांना नौकरया दिल्या.एवढचं नाही “अंगरक्षक ” नेमले.महाराज गादीवर आले तेव्हा त्यांचे स्वागत नैसर्गीक संकटांनी झाले.प्लेग हिवताप कॉलरा, अशी संकटे आली.त्या काळी साथीचे रोग महाभयंकर वाटायचे.प्लेग ची साथ आली म्हणजे नऊ ते दहा हजार लोक बळी पडत.कारण रूढी परंपरा अंधश्रद्धा होत्या.त्या मुळे लोक लस टोचून घेत नसत.
१९९८-९९ मध्ये कोल्हापूर स़ंस्थानात प्लेग ची लागण झाली.अनेक लोक बाधीत झाले.संस्थानाने शास्रशुद्ध परिपत्रके वाटली.परंतू महाराजांनी ताबड तोड उपाय योजना करून दळण वळणाच्या मार्गावर “क्वारांटाईन “स्थापन केले.जत्रा थांबवल्या.रेल्वेनं जे लोक ये -जा करायचे त्या़ची वैद्यकिय चाचणी होत होती.तरीही काही लोकांना या रोगाचा संसर्ग होत होता.त्या वर महाराजांनी उपाय शोधला.अश्या लोकांना शोधून काढण्या साठी ५ ते १५ रूपया प्रयंतची बक्षीसं जाहीर केली.एवढचं नाही तर खेडे गावातील अधीकारयांना सक्त ताकीद होती की जर त्यांनी हूकूम पाळले नाही तर त्यांचे उत्पन्न थांबवण्यात येईल.
शाहू राजांनी गरीबांना जंगलात झोपड्या बांधण्या साठी फुकट साहित्य पुरविले.सन १९१०-११च्या पावसाळ्यात प्लेग चा जेव्हा दुसरा शेवटचा टप्पा होता .त्या वेळेला महाराजांनी लोकांना “लस”टोचून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.संस्थानातील कर्मचारी यांना तीन दिवसाची खास रजा दिली.श्रमाचे काम करणारया लोकांना आठ आण्याचे बक्षीस जाहीर केले.
सन १९२० सालची गोष्ट .महाराजांचा मुकाकाम सोनतळी कॅंम्प यथे होता.दूपारची भोजनाची वेळ होती.पण महाराज उठेनात.तेवढ्यात सांगली -मिरज येथील दलित मंडळी भेटण्या साठी आली होती.महाराज त्यांना ही जेवना साठी घेऊन गेले.जेवन आटोपली.पण स्वयंपाकी व कर्मचारी मंडळी पाने उचलेना.त्यांची टंगळ मंगळ सुरू होती.त्यांची पाने कुणी उचलावी ?हा प्रकार महाराजांच्या लक्षात आला.त्यांनी सत्तेचा वापर नाही केला.नामी उपाय शोधला.महाराज स्वत:केरसुनी हातात घेऊन भोजनगुरूहात गेले.सर्व कर्मचारी घाबरले.त्यांनी महाराजांचे पाय धरले.या पुढे अशी चूक होणार नाही.म्हणूनचं महाराज मानवतावादी महापुरूष होते.
एकदा पांडोबा यवतेश्वरकर चीज शिकवीत होते.महाराजांनी चीज चा अर्थ विचारला.त्यांना सांगता नाही आला.महाराजांनी खॉं साहेबांना बोलावून घेतले.व चीज चा अर्थ सांगा असे म्हणाले.तेव्हा खॉं साहेब म्हणाले ” जो रयतेला सतावत नाही.पीडा देत नाही.अन्यायाने कुणाला लुटत नाही,शत्रू बरोबर ही न्यायाने वागतो.त्याला बादशहा म्हणावे.अधमांना जवळ करीत नाही.शीलवंताचा गूणवंताचा आदर करतो,त्याला राजा म्हणावे.
महाराज खूष झाले.त्यांनी खॉ साहेबांना धन्यवाद दिले.
राजर्षी शाहू महाराज यांनी संगित,नाटक,चित्रकार,गायक,मल्ल,अश्या सर्वांनाच पोटाशी धरले.त्यांचा सन्मान केला.काहींना जमिनी दिल्या.घरे दिली.नोकरया दिल्या.या साठी महाराजांनी उभी हयात घालवली.तो काळ मिरासदारीच्या पुजेचा असुनही ती सोनेरी श्रूखला तोडून जे विवेक बुद्धीला पटले.ते ते महाराजांनी कोणाच्याही रागाची ,लोभाची पर्वा न करता आचरणात आणले.सामाजिक क्रांर्तीचे त्यांचे स्वप्न एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आजच्या वादळी जीवनात आपल्याला वाट दाखवायला पूर्णपणे समर्थ आहे
अ.फ.भालेराव (साहित्यिक)9405706570/7218831645
संदर्भ:-राजर्षी शाहू गौरव ग्रंथ