जळगाव(प्रतिनिधि):जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर आदर्श पुरस्कार 2020 या सोहळ्यात शैक्षणिक सामाजिक तसेच लेखनिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मनोज भालेराव यांना आदर्श लेखक-कवी आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ते प्रगती विद्यामंदिर येथे शिक्षक असून विद्यालयात विद्यार्थ्यांचे सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत.कृतितुन शिक्षण यावर भर देत त्यांनी विज्ञान व भूगोल या विषयातील संकल्पना मैदानावर आकृतिद्वारे मांडून उपक्रम सादर केले आहेत,वृक्षारोपण,राखी बनवणे,साबण बनवणे,विज्ञान कृतीतून,प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत त्याच बरोबर हस्तलिखित तयार करेन वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन करून उपक्रम राबविले आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून वर्गाचे तिन हस्तलिखित प्रकाशित आहेत.त्यांचे वर्तमानपत्रातुन विविध सामाजिक शैक्षणिक लेख आणि कविता प्रकाशित होत असतात. त्यांचा समाजसेवी उपक्रमांमध्ये पण सक्रिय सहभाग असतो.त्यांना या अगोदर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श लेखक-कवी,शिक्षक हा पुरस्कार त्यांना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या कडून प्रदान करण्यात आला या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे,शिक्षकवर्ग उपस्थित होते.पुरस्कार प्राप्तिमुळ त्यांचे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.