पाचोरा – आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञतेतुन व सेवाभावाने अॅड.सौ. कविता रायसाकडा यांनी कोळी समाजातील 21 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य आज दि. १४ जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी वाटप करण्यात आले.त्यात शालेय बॅग, टिफीन बाॅक्स, वाॅटर बॅग, कंपासपेटी, वह्या,असे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सौ.कविता रायसाकडा यांनी आपल्या मनोगतात दर वर्षी हा उपक्रम वाढीव विद्यार्थीसमवेत असाच प्रत्येक वर्षी घेतला जाईल,तसेच समाजातील विद्यार्थी यांनी शिक्षणात पुढे जाऊन स्पर्धा परीक्षाकडे लक्ष केंद्रित करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी कोळी महासंघाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पि. के. आण्णा सोनवणे,अनिकेत सुयवंशीॅ,अनिल मासरे,राजेन्द्र खैरनार,सुनिल मोरे,लेखराज सोनवणे, सुनिल कोळी,देविदास जाधव, आदी समाज बांधवासह
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, पाचोरा ता.अध्यक्ष सचिन पाटील, जेष्ठ पत्रकार शांताराम चौधरी, अबरार मिझाॅ उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विनायक मोरे यांनी केले तर आभार किशोर रायसाकडा यांनी मानले.