उदगीर प्रतिनिधी,(राहुल शिवणे) – सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराच संकट आलेल आहे. आपल्या देशावर आलेल्या संकटवार मात करण्यासाठी यावर्षीची येणाऱ्या ३१मे रोजीची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती समाजबांधवांनी आपापल्या घरीच प्रतिमेचे पूजन करून साजरी करावी आणि खरा जयंती उत्सव कोरोनासारख्या महाभयंकर संकटावर मात केल्यास म्हणजे लॉकडाउन संपल्यावरच साजरा करावा. देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महात्वाची भुमीका बजावुन आपले देशासाठी योगदान द्यावे.
अहिल्यादेवींचे कार्य तमाम संपूर्ण समाजाला प्रेरणादायी आहे. पहिला आंतरजातीय विवाह अहिल्यादेवींने स्वतःहून घडून आणला,भारतात 250 वर्षांपूर्वी महिलांची फौज तयार केली.अनेक ठिकाणी विहिरी ,तलाव बांधले.
कोरोना या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये त्यांचे काटेकोरपणे पालन करावे , आपापल्या घरीच जयंती साजरी करून सहकार्य करावे आणि देशासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन धनगर समाज युवा नेते प्रकाश भैया नरवटे यांनी केले आहे.