जामनेर,(बाळू वाघ)- शहरालगत असलेल्या कोदली रोडवरील संदीप डांगी फार्मच्या बाजूच्या शेतात दीडशे लोकांची काल दि.25 रोजी जेवणाची पार्टी करून नियम मोडल्या प्रकरणी समाधान वाघ यांच्यासह इतर 15 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईचा पवित्रा घेतल्याने खळबळ उडाली आहे.
या पार्टीत दीडशे च्या आसपास लोक उपस्थित होते असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पो.नि. इंगळे यांनी माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतांना,कलम 144 लागू असतांना कोणतेही परवानगी न घेत, सोशल डिस्टन्स न पाळता दीडशे च्या जवळपास लोकांनी एकत्र येऊन भोजन पार्टी केल्याचे निदर्शनात आल्याने समाधान वाघ व इतर पंधरा गोटू बोरसे, रवींद्र बढे, सागर जाधव, अंकुश माळी, गोपाल वाघ, दत्तू पाटील, गणेश माळी, संतोष झाल्टे, अरुण जाधव, राहुल माळी, दत्तात्रय माळी, अमोल उर्फ भैयाराज,कल्पेश माळी व इतरांविरुद्ध पोलीस शिपाई राहुल मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 269, साथ रोग अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास किशोर पाटील करीत आहे.