पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना पंढरीनाथ सपकाळे , राजेंद्र कोळी, प्रा. संजय मोरे
रावेर, दि.२७(प्रतिनिधी) – लॉकडाऊन मुळे सर्वत्र दुकाने बिअर बार बंद असून दारू विक्रीवरही बंदी आहे.मात्र रावेर तालुक्यातील सुनोदा गावात मात्र गावठी दारू विक्री सर्रास सुरू आहे.परिसरातील अनेक गावांमध्ये दारू विक्री बंद झाली मात्र सुनोदा गावात संध्याकाळी दारू पिणाऱ्यांची गर्दी होत असते तेथे जणू यात्राच भरत असते.तरी गावातील दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
सुनोदा येथे परिसरातील धामोडी, वाघाडी,खिर्डी,निंभोरा, दसनूर,तांदलवाडी,थोरगव्हाण,गाते, सावदा स्टेशन,लुमखेडा, तासखेडा यांसह झ्तरही गावातील लोक दारू पिण्यासाठी येथे येत दररोज गर्दी करत आहे.
दरम्यान गावातील दारू विक्री बंद होणे बाबत फैजपूर येथील प्रांताधिकारी अजीत थोरबोले यांना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांच्या कार्यालयास येथील ग्रामस्थांच्यां सहयांचे निवेदन दि. १५ रोत्री देण्यात आले होते. तसेच याआधी गावचे सरपंच तथा पोलिस पाटील यांनी निंभोरा पो. स्टे. ला निवेदन दिले होते..मात्र दारू विक्रेत्यांवर निंभोरा पो. स्टे. चे एपीआय महेश जानकर यांनी तात्युरती कारवाई केली व पुन्हा लगेचच येथे सर्रास दारू विक्री सुरू आहे.गावातील दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई होत नसल्याने गावात मोठया प्रमाणात दारू विक्री सुरू आहे.या दारूमुळे मागील महिन्यात मावातील गरीब कुटूंबातील पंडीत सपकाळे (वय ६०),जगन्नाथ कोळी (वय ३५), अनिल कोळी ( वय ३५) या तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या लोकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यास कारणीभूत गावातील दारूविक्री करणारे हे लोक आहेत.केंद्राच्या लॉकडाऊचा काहीही फरक दारू विक्रेते व पिणाऱ्यांवर दिसत नाही.
दारू विक्रेत्यांवर काहीही कडक कारवाई होत नसल्याचे बघून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या सहयांचे निवेदन दि.२७ सोमवार रोजी जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, दारू उत्पादन शुल्क अधिक्षक एन. के. धार्मिक, पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दिले आहे व या समस्येकडे लक्ष घालून गावातील गावठी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.