Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदय पिळवटून टाकणारी घटना : ‘मामा, लवकर या.. आमचा सगळ्यांचा गळा चिरलाय’

Editorial Team by Editorial Team
January 8, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर: एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरल्याची घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे घडली. एवढंच नव्हे तर संबंधित शेतकऱ्यानेही विष प्राशन करून स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण ऐनवेळी 14 वर्षीय मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून मामाला कॉल करून घटनेची माहिती दिली. यानंतर मामाने घटनास्थळी धाव घेत, चौघांनाही रुग्णालयात दाखल केलं. सुदैवाने चौघेही बचावले आहेत.

काय आहे घटना

रेणापूर येथे आतिष बाबूराव नरके हे पत्नी विशाखा (34), मुलगा पारस (14) आणि लोकेश (12) यांच्यासह राहतात. आतिष नरके यांनी गुरुवारी आपण फिरायला जाऊ असं सांगत कुटुंबियांसह दुचाकीने अंबाजोगाईला घेऊन गेले. पण याठिकाणी राहण्यासाठी लॉज न मिळाल्याने आतिष आपल्या कुटुंबाला हॉटेलमध्ये जेवू घातलं आणि पुन्हा लातूरकडे निघाले. दरम्यान वाटेत असणाऱ्या शेरा गावाकडे त्यांनी दुचाकी वळवली आणि एका शेतातील उसाच्या फडाजवळ जाऊन दुचाकी थांबवली. याठिकाणी नरके यांनी टॉनिक असल्याचं सांगून पत्नीसह दोन्ही मुलांना विष पाजलं.

तिघांची शुद्ध हरपल्यानंतर नरके यांनी तिघ्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केलं आणि ब्लेडने गळ्यावर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेनंतर काही वेळातच 14 वर्षीय पारसला जाग आली. त्याने तातडीने आपल्या वडिलांच्या मोबाइलवरून आपले मामा श्रीकांत पवार (सुगाव, ता. अंबाजोगाई) यांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. मामाने क्षणाचाही विलंब न करता, आपल्या काही नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

याठिकाणी पोहोचल्यानंतर, त्यांना मेहुणे आतिष नरके, बहीण विशाखा नरके, भाचा पारस आणि लोकेश सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात आढळले. पारस थोडा शुद्धीवर होता तर इतर तिघे बेशुद्ध होते. मामा श्रीकांत पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना लातूरच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केलं. पारस आणि मेहुणे आतिष नरके शुद्धीवर आले आहेत. तर लोकेश आणि विशाखा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीसह मुलांची हत्या करून आपणही आत्महत्या करणार होतो, अशी माहिती आतिष नरके यांनी आपल्या मेहुणे श्रीकांत पवार यांना दिली. यानंतर श्रीकांत पवार यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात शेतकरी आतिष नरके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह, केलं हे आवाहन

Next Post

भाजपा नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भाजपा नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी

भाजपा नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us