पाचोरा(प्रतिनिधी)भडगाव रोड परिसरातील जयराम कॉलनीतील हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे आमदार किशोर पाटील व माजी नगराध्यक्षा सौ.सुनीताताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.तर प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी इश्वर कातकड़े, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,पोलीस उप निरीक्षक गणेश चौबे,जेष्ठ नागरिक पी. जी. चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार म्हणाले की,अनेक वर्षांपासून यातील रहिवाशी नागरिकांनी हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाची मागणी केली होती.त्यांच्या मागणी नुसार नगर पालिका फँडातून पाच लाख रुपये खर्चाचे सुशोभीकरण काम मंजूर करून दिले.त्याचे आज भूमिपूजन झाले आहे.तसेच आमदार फँडातून या ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक व शुभ कार्यासाठी रंगमंच देणार आहे.जेणे करून या परिसरातील रहिवासीयांना मंगल कार्यालयात लागणारा पैसा खर्च न करता विकसित जागेचा सदुपयोग होणार आहे.यापुढे देखील या भागातील रहिवासीयांना अपेक्षित असलेले सहकार्य व कामे मागणी केल्यास पूर्ण करण्याची ग्वाही आ.किशोर पाटील यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, पुनगाव ग्रा.प.सदस्य प्रवीण पाटील,ए.के.पाटील,भावसिंग हवलदार,डॉ.अनिल महाजन,जितेंद्र पाटील, आप्पा सुरवाडे, महिलांमध्ये सुशिलाबाई पाटील,लिलाबाई चौधरी,कल्पना राजपूत, शोभा सुर्यवंशी, छाया महाजन,पूनम पाटील,चित्रा पाटील,मनीषा धोबी,संगीता सुरवाडे याची उपस्थिती होती.
नितीन चौधरी,गजू पाटील,अतुल पाटील,प्रशांत येवले, नयन सुर्यवंशी,प्रणव चौधरी,आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य व परिश्रम घेतले. आबा सुर्यवंशी यांनी आमदार, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उप नगराध्यक्ष शरद पाटे,उप मुख्याधिकारी राजेंद्र पाटील, उद्योजक मुकुंद बिलदीकर,प्रभागाचे नगरसेवक शीतल सोमवंशी स्विय सहाय्यक राजेश पाटील, नगर अभियंता श्री.सुर्यवंशी यांनी मंदिर सुशोभोकरण कामासाठी केलेल्या सहकार्याचे आणि उपस्थितांचे आभार मानले.














