Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा : मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आवाहन

najarkaid live by najarkaid live
September 29, 2022
in राज्य
0
सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा : मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर, (महेश गायकवाड)- मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे, अशी अफवा सोशल मीडियातून दूरवर पसरली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाही. तरीपण, शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा आहेत. बहुतेक शाळांमध्ये मुले स्वत:हूनच शाळेला जातात. पण, मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवेनंतर काही पालकांनी मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. पण, अफवा असली तरीदेखील पोलिसांनी शाळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. शाळेत आलेल्या मुलाला न्यायला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास, संबंधित शाळांनी संबंधित पालकाला कॉल करून त्या व्यक्तीची खात्री करावी आणि मगच मुलाला त्याच्याकडे सोपवावे. शाळा परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

मुलांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याशी योग्य संवाद साधावे असे ही त्यांनी सूचना केली आहे.मुलांना परिस्थिती समजावून सांगा की, अनोळखी व्यक्तीशी बोलू नको,अनोळखी व्यक्तीने चॉकलेट, खाऊ, मोबाईल किंवा व्हिडिओ गेम दिला तरी घेऊ नका,जर कोणी तुम्हाला हात लावला किंवा धरले तर आरडा-ओरडा करा, आजूबाजूच्या लोकांकडून मदत मागा,रस्त्याने चालताना पालकांचा हात सोडू नका, पुढे-मागे पळू नका

पालकांनी अशी घ्यावी काळजी

मुलांना परिस्थिती समजावताना त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या

गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेऊ नका; सतत सतर्क राहा

मुलांना गर्दीत नेले तर त्यांचा हात सोडू नका. त्यांचा स्पर्श होत राहील याची काळजी घ्यावी. पदर, शर्ट हातात द्या

काही आक्षेपार्ह हालचाल आढळल्यास ११२ या टोल फ्री नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवा

पोलिसांचे आवाहन

पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती तुम्ही पुढे फॉरवर्ड करू नका; व्हिडिओ, ऑडिओवर विश्वास ठेवू नका

पोलिसांनी सांगितल्याशिवाय नागरिकांनी कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल करू नये

तुमच्या मोबाईलवर मुलांच्या अपहरणासंदर्भात काहीही आलं, संशयास्पद वाटलं तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा

पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास ११२ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा, पालकांनी घ्यावी खबरदारी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याचे कोणतेही रेकॉर्ड पोलिसांत नाही. सोशल मीडियातून अफवा पसरविण्यात आली आहे. तरीपण, पालकांनी व शाळांनी सतर्कता बाळगावी. पालकांनीच मुलांना आणायला शाळेत जावे. शाळांनीही पालकांऐवजी कोणी दुसरा अनोळखी मुलाला न्यायला आला, तर संबंधित मुलाच्या पालकांकडे खात्री करावी.

– तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवा सेनेच्या महिला पदाधिकारी यांना अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल !

Next Post

हाजी अजमल शहा यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
हाजी अजमल शहा यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड

हाजी अजमल शहा यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us