जळगाव(प्रतिनिधी):करोना महामारीने लॉक डाऊनमुळे संकटात सापडलेल्या तसेच बेरोजगार झालेल्या जळगाव शहरातील विधवा , हातमजुर, गरजू, कष्टकरी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज बांधवांना सामाजिक आधार मिळण्यासाठी 14 मे 2020 रोजी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमामार्फत 50 गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक किराणा किटचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले.
सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मासिकाचे संपादक, मुंबई परिसर मंडळाचे माजी अध्यक्ष कैलास बन्सीलाल मराठे व विजय पाटील सर सहसंपादक सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मासिक यांनी सामाजिक बांधिलकीने जळगाव शहरातील आपल्या समाजातील गरजू कुटुंबाना सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहामार्फत मोफत किराणा किटचे वाटप करण्याचे जाहीर केले
याउपक्रमात कैलास मराठे यांनी 20 किट, एन एस पाटील (कार्यकारी अधिकारी , ना. गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री म रा) यांनी 10 किट , जळगाव महिला मंडळ यांनी 12 किट, , संदीप नीलकंठ पाटील सर यांनी 5 किट, विजय पाटील सर 2 किट, चिंतामण बाजीराव पाटील यांनी 1 किट असे एकूण 50 किटचे योगदान देऊन सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहाच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून समाजातील गरजू पर्यंत एक छोटीशी मदत पोहचवता आली घरोघरी किराणा किट वाटपकामी संतोष मराठे यांनी संपूर्ण शहरात आपल्या मालवाहू गाडीसह स्वतः मदत केली
शहरातील 50 कुटुंबियांना प्रत्येकी 5 किलो गहू, 1किलो तूरडाळ, 1किलो तेल, 1किलो साखर, मीठ, चहा पावडर ,मिरची,रिन साबण, आंघोळीचा साबण या किराणा किटचे घरपोच वाटप करण्यात आले
यावेळी डॉ भास्कर पाटील, श्री विजय पाटील सर, संदीप पाटील सर , योगेश पाटील, सोनू पाटील , किशोर पाटील जळगाव महिला मंडळ अध्यक्ष सौ सुमनताई शेळके,सौ ज्योतिताई पाटील, सौ वर्षाताई काळे,सौ रेखाताई महाजन ,आदी उपस्थित होते.
किराणा किटचे घरोघरी वाटप कामी विजय पाटील सर,संदीप पाटील सर, सोनू पाटील, योगेश पाटील, अवधुत शिंदे,किशोर पाटील, धनराज पाटील व संतोष मराठे यांचे सहकार्य लाभले.