जळगांव – हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 या सन्मान सोहळा कार्यक्रमात सरस्वती विद्या मंदिर च्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांना सन्मानित करण्यात आले.
सुवर्णलता अडकमोल यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य वृक्षा रोपण, शाळू माती गणपती कार्यशाळा, सिडबोल बनवणे,तसेच पर्यावरण विषयावर चर्चा सत्र व जनजागृती उपक्रम राबविले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नूतकेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन मध्ये आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार2019 या सन्मान सोहळा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्ज्वला पाटील व प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे सर यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले
या वेळी उपस्थित ईकरा संस्थाचे अब्दुल करीम सालार, रेडक्रॉस संस्थाचे गणी मेमन,
माजी डाएट प्राचार्य श्री नीळकंठ गायकवाड,नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक मा अर्चनाताई सूर्यवंशी,सुधाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई कुर्हाडे,मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, प्रवीण फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष अकिल पहेलवान, आदींच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.