पुणे- सावरकर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत खूप वेगळा असता. ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह धरल्याबद्दल तसेच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉ. आंबेडकरांच्या ऋणात राहिले पाहिजे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.
स्वा. सावरकर वाङमय वक्तृत्व स्पर्धा समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी गोखले बोलत होते. या वेळी गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. एखाद्या व्यक्तीला समाजपुरुष मानणे हा आपला सामाजिक दोष आहे. एखाद्याला देवत्व देऊन आपण धन्य होतो. मात्र, तीही माणसेच आहेत. ती चुकू शकतात. त्यांनी काय चांगले केले त्याचे स्मरण ठेवले पाहिजे,’ असे गोखले यांनी स्पष्ट केले. एवढंच नाही तर केवळ स्पर्धेसाठी नव्हे; तर आयुष्यभरासाठी सावरकरांचे विचार अभ्यासा आणि स्वीकारा, असा सल्ला गोखले यांनी यावेळी दिला.