मुंबई – समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीतील १० जणांना ताब्यात घेतले असतांना यात एक बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा आहे अशी माहिती समोर आली होती दरम्यान या रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु असल्याचे समजते.
मुंबईहून हे क्रूझ जहाज गोव्याकडे जात होते. कारवाई दरम्यान घेतलेल्यांपैकी दोन जण हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीने ८० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही यावेळी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. दरम्यान आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी केली होती कारवाई…
एनसीबीला या पार्टी बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत. बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १० लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.









