Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्तापेच सुटणार? सोनियांची शरद पवारांशी चर्चा

najarkaid live by najarkaid live
November 12, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
सत्तापेच सुटणार? सोनियांची शरद पवारांशी चर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली. आता हे तिघेही मुंबईला रवाना होणार आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तर शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. तर आज सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर पुढील चर्चेसाठी ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाळ यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः वेणुगोपाळ यांनी ट्विटरवरून दिली. ‘पटेल, खरगे आणि मी मुंबईला जाणार असून, शरद पवारांची भेट घेऊन पुढील चर्चा करणार आहोत,’ असंही वेणुगोपाळ यांनी सांगितलं. आता काँग्रेस काय भूमिका घेणार? सत्तापेच सुटणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

तत्पूर्वी, सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचं खापर फोडलं आहे. तसंच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता काँग्रेसचे दिल्लीतील नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यात नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ही भेट होणार का? किंवा काँग्रेस काय भूमिका घेणार आहे, हे या भेटीनंतरच स्पष्ट होणार होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार

Next Post

सरकार स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट? ही पाच समीकरणं जाणून घ्या!

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सरकार स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट? ही पाच समीकरणं जाणून घ्या!

सरकार स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट? ही पाच समीकरणं जाणून घ्या!

ताज्या बातम्या

Share Market Today: Indian Bank, JSW Steel, Nykaa आणि हे शेअर्स आज देतील जबरदस्त परतावा | शेअर बाजारात तेजीची शक्यता

October 29, 2025
Crime News : १७ वर्षीय मुलाने प्रेयसीला जाळले

October 28, 2025
NMDC Apprentice Recruitment 2025: भारत सरकारच्या कंपनीत सुवर्णसंधी – फ्रेशर्ससाठी मोठी भरती!

ZP Election Reservation 2025: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण पुन्हा वादात; राज्यभर तब्बल ९०० हरकती दाखल

Ladki Bahin Yojana 2025: तब्बल ₹43 हजार कोटी खर्चामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढला

PMAY 2025: ‘प्रधानमंत्री आवास योजना’साठी ऑनलाईन अर्ज सुरू, मिळणार ₹1.20 लाखांची थेट मदत!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us