कासोदा (प्रतिनिधी) येथील संताजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसावा वर्धापन दिन संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
सुरवातीला श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव गुरुजी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. संताजी पतसंस्थेची स्थापना दिनांक 22/10/1992 करण्यात आली सुरुवातीला दोनशे पन्नास सभासद व 50 हजार रुपये खेळते भांडवल होते. एवढ्या भांडवलावर संस्था सुरुवात करण्यात आली .आज तीस वर्षाच्या कालावधीत संस्थेने खूप मोठी प्रगती केली आहे .खेळते भांडवल तीन कोटीच्यावर असून अडीच कोटींच्या ठेवी आहेत सभासदांना जामीनकी सोने तारण याद्वारे कर्जपुरवठा केला जातो.
संस्था दरवर्षी नफ्यात असून सभासदांना 10 ते 15 टक्के लाभांश वाटण्यात आलेला आहे. संस्थेच्या ऑडिट वर्ग अ आहे संस्थेची दुमजली इमारत असून सर्व व्यवहार संगणकाद्वारे चालतात संस्थेच्या संचालक मंडळात सर्व समावेशक मंडळी असल्याने प्रत्येक योग्य ते मार्गदर्शन करतात त्यामुळे संस्थेची भरभराटी होत आहे असं सांगताना आज मनापासून खुप आंनद होत आहे असे बाजीराव गुरुजी यांनी छोटेखानी कार्यक्रमात सांगितले.
यावेळी चेअरमन डॉ डी आर पाटील,व्हाचेअरमन राजेंद्र शिंपी, हिरालाल चौधरी, संजय बोरसे, सुरेश ठाकरे,सुरेश सिंग परदेशी, कल्पनाबाई चौधरी,वंदनबाई चौधरी व्यवस्थापक राजेंद्र जाधव,लिपीक सतिष चौधरी आदी उपस्थित होते.










