Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी

Editorial Team by Editorial Team
July 31, 2022
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) एकापाठोपाठ एक छापे टाकले जात आहेत. अशातच आता तपास यंत्रणेचे पथक शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या भांडुप, मुंबईतील घरी पोहोचले आहे. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे

ईडीचे पथक आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. राऊत यांचे समर्थक तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देत आहेत. 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर त्यांना 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतरच हजर राहू शकतात, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत पाठवण्यात आली. या प्रकरणी ईडीने राऊत यांची दादर आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.

यापूर्वी, ईडीच्या समन्सच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा हवाला देत राऊत यांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरण?

ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. हे काम म्हाडाने त्यांच्याकडे सोपवले होते. याअंतर्गत मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळमध्ये ४७ एकर जागेवर ६७२ भाडेकरूंच्या घरांचा पुनर्विकास करण्यात येणार होता.

हे पण वाचा :

1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम

शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! भोसरी भूखंड प्रकरणाचा तपास एसीबीकडे

8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा

ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडाची दिशाभूल केली आणि फ्लॅट न बांधता ही जमीन 9 बिल्डरांना 901.79 कोटी रुपयांना विकली. नंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने Meadows नावाचा प्रकल्प सुरू केला आणि घर खरेदीदारांकडून फ्लॅटसाठी 138 कोटी रुपये जमा केले.

बांधकाम कंपनीने 1,034.79 कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीरपणे कमावल्याचे तपासात उघड झाले आहे. नंतर त्याने ही रक्कम बेकायदेशीरपणे त्याच्या साथीदारांकडे वर्ग केली.

ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ची भगिनी कंपनी आहे. एचडीआयएलने प्रवीण राऊत यांच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.

2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरीने 83 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. या रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. ईडीने तपास सुरू केल्यानंतर वर्षा राऊतने माधुरी राऊतच्या खात्यावर ५५ लाख रुपये पाठवले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर जागा रिक्त, पदवीधरांना नोकरीची संधी..

Next Post

तरुणांनो संधी सोडू नका ! रेल्वेत 1654 जागांसाठी बंपर भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

तरुणांनो संधी सोडू नका ! रेल्वेत 1654 जागांसाठी बंपर भरती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us