Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळावरून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजणांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फोन….

najarkaid by najarkaid
November 2, 2021
in Uncategorized
0
शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण स्थळावरून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजणांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फोन….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – पातोंडा व मुंदखेडा येथील धरणग्रस्तांना गत २२ वर्षांपूर्वी भूसंपादन करताना शेतीचा पूर्ण मोबदला शासनाकडून अद्याप मिळालेला नाही. या माेबदल्यासाठी भूसंपादन शेतकरी आज सोमवार दि.१ नोव्हेंबर रोजी पासून आमरण उपोषणाला पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असता सायंकाळी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषण स्थळाला भेट दिली यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं एकूण घेतल्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधत शेतकऱ्यांची बाजू मांडली असता यावर लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.

काय आहेत प्रकरण?

चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा-पातोंडा शिवारातील भूसंपादन प्रस्ताव क्र.४४/०४ व ५०/०४ जमिनी संपादित झालेल्या असून जवळपास सन १९९९ ते २००५ पासून जमिनीचा ताबा कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांनी घेतलेला असून विशेष भूसंपादन अधिकारी यांनी कमी प्रमाणांत मोबदला दिलेला होता. म्हणून शेतक-यांनी मे. दिवाणी न्यायालय, जळगांव याठिकाणी कलम १८ अन्वये भूसंपादन मोबदला वाढवून मिळणेसाठी अर्ज दाखल केलेले होते. सदर एल.ए.आर मध्ये मे.न्यायालयाने सन २०१७ मध्ये निकाल दिलेला असून जवळपास ३ वर्षापुर्वी दिलेला आहे. आमच्या मोबदला रक्कम मिळण्याचे प्रस्ताव विशेष भूसंपादन अधिकारी जळगांव यांचे कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग, जळगांव यांचेकडून तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगांव यांचेकडे गेलेले आहे. तथापी शेतकऱ्यांना कोर्टाच्या तडजोडीनुसार अद्यापपावेतो वाढीव मोबदला रक्कम मिळालेली नाही.

तसेच मौजे पातोंडा मुंदखेडा येथील मे. दिवाणी न्यायालयाने निकाल दिलेल्या भूसंदर्भाच्या रेग्युलर दरखास्ती या दिनांक ०४/०४/२०१९ व दि.२०/०४/२०१९ रोजी मध्यस्थी तडजोड नाम्याने निकाली काढण्यात आलेल्या आहेत. सदर दरखास्तीमध्ये १५ टक्के प्रमाणे सुमारे २ वर्षाचे रू.१५ ते २० कोटी रूपयाचे व्याज सोडण्यात आलेले आहे. तरी मे. कोर्टाने ठरविलेल्या तडजोडीचा अवमान झाल्यामुळे आजपर्यंत व्याजाचे पैसे सुध्दा शेतकऱ्यांना द्यावे. सदर रेग्युलर दरखास्तीमध्ये अद्यापपाठतो रक्कम जमा करण्यात आलेली नाही. तसेच सदर दरखास्तीमध्ये कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग, कार्यकारी संचालक तापी विकास महामंडळ व जिल्हाधिकारी सो. जळगांव यांच्या विरुध्द् मे. कोर्टात जप्ती आदेश जिल्हाधिकारी सो. यांचे शासकीय वाहन व संबधीत कार्यालयाचे बँक खात्यात असलेली रक्कम गोठविण्याचे आदेश मे. कोर्टाने दिला असता, संबंधित सदर रक्कम मे. न्यायालयात जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच जळगांव / चाळीसगांव येथील न्यायालयाने निकाल दिल्याच्या निर्णयाविरूध्द कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी मे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अपील दाखल केलेले होते. त्यामध्ये मे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदरची रक्कम १२ आठवडयांच्या मुदतीत देण्याचा आदेश केलेला आहे. तरी सुध्दा मे. उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन, तापी पाटबंधारे विकास महामंडळ विभाग, जळगांव तसेच कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग, जळगांव यांनी आमची रक्कम मे. न्यायालयात भरलेली नाही. सदर रक्कम भरण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा निवेदन देवून पाठपुरावा केलेला आहे. परंतु आजतागायत शेतकऱ्याच्या रकमा भरणा केलेल्या नाहीत. तसेच संबधित शेतकरी वयोवृध्द झालेले असून त्यांचे आजारपण व मुला-मुलींचे लग्नविवाह, इतर पतसंस्थेचे कर्ज आणि शेतक-यांची दिवाळी देखील अंधारात आहे.

दरम्यान मे.दिवाणी न्यायालय यांच्याकडे संबंधित रकमेचा भरणा न केल्याने मौजे मुंदखेडा-पातोंडा येथील भूसंपादन शेतकरी आजपासून पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळीमध्ये लसीकरण करून घ्या, अन्यथा…जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचे आवाहन

Next Post

अजित पवारांना आयकर विभागाचा झटका, 1400 कोटींची मालमत्ता जप्त

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
अजित पवारांना आयकर विभागाचा झटका, 1400 कोटींची मालमत्ता जप्त

अजित पवारांना आयकर विभागाचा झटका, 1400 कोटींची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us