Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकरी बांधवांनो..! माती परीक्षणामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते, माती परीक्षण कसे करावे?

Editorial Team by Editorial Team
April 26, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेतकरी विविध संकटाना तोंड देताना दिसून येत आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला माती परीक्षणाबद्दल सांगणार आहोत. कारण याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असायलाच हवी, कारण माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते व पुढील पीक नियोजन करता येते.

माती परीक्षणाचे फायदे-
माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. जमीन आम्लधर्मी आहे किंवा विम्लधर्मी आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते. माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. माती परीक्षणामुळे पिकाच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते.

मातीचा नमुना केव्हा घ्यावा ?
मातीचा नमुना साधारणत: पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यावा. खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये. शेतात पीक असताना मातीचा नमुना दोन ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा

*मातीचा नमुना घेण्यासाठी आवश्यक साहित्य टिकाव,फावडे,खुरपे,घमेले किंवा गिरमिट, स्वच्छ गोणपाट कापडी पिशवी.

मातीचा नमुना कसा घ्यावा ?
मातीचा नमुना घेताना जमिनीचा रंग, उंच, सखलपणा, पोत, खोली याबाबींचा विचार करावा. सर्वसाधारणपणे पिकासाठी जमीन जर एकसारखी असेल तर दोन हेक्टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे माती नमुने घेऊन त्यातून एका मातीचा प्रातिनिधिक नमुना तपार करावा. एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन असल्यास प्रत्येक प्रकाराच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

माती नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये.
जनावरे बसण्याची जागा, खत, काडीकचरा टाकण्याची जागा,बांधावरील माती, कंपोस्ट खड्ड्याची जागा, पाण्याच्या पाटावरील जागा, विहिरी जवळील जागा, दलदलीची जागा.
*माती नमुना तपासणी प्रकार व तपासणी फी -*
साधा माती नमुना तपासणी ३५/-, सुक्ष्म अन्नमूलद्रव्य माती नमुना तपासणी २००/-, विशेष अत्रमुलद्रव्य माती नमुना तपासणी २७५/-.

मातीचा नमुना घेण्याची पद्धत-
मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा दगड इ. हाताने बाजूला करावेत. नमुना घेण्यासाठी टिका किंवा फावड्याने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी “V” आकाराचा खड्डा करावा. खड्डयाच्या एका बाजूची 2-3 सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी. अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात एकत्र करावेत. मातीतील काडीकचरा, दगड बाजूला करून ती चांगली मिसळावी व स्वच्छ गोणपाटावर घ्यावी. गोणपाटावर मातीचा ढीग करून चार समान भाग करावेत. या समान चार भागामधून समोरासमोरीत दोन भाग काढून टाकावेत.
उरलेल्या दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करून परत दोन भाग काढून टाकावेत. याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत वरील क्रिया करावी. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी वाळविलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

मातीचा नमुना कोठे व कसा पाठवावा.
मातीचा नमुना घेतल्यानंतर माती परीक्षण नमुना चिठ्ठीवर माहिती लिहून लवकरात लवकर नजीकच्या शासकीय / अशासकीय नोंदणीकृत माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. माती परीक्षण नमुना चिठ्ठीवर खालील माहिती लिहावी. शेतकऱ्याचे नाव, नमुन्याचा क्रमांक, सर्वे नंबर गट नंबर, माती नमुना घेतल्याची तारीख, नमुना घेतलेल्या जमिनीचं एकूण क्षेत्र (एक हेक्टर), जमिनीचा उतार (जास्त /मध्यम/ खोल), बागायत, कोरडवाहू, जमिनीचा रंग भुरकट काळी, मागील वर्षी घेतलेल्या पिकाचे नाव, पुढील हंगामात कोणते पीक घेणार आहे त्याचे नाव असावे.

अधिकच्या माहितीकरीता आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. असे अहवान संजय हिंमतराव पवार, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील 57 शेतकऱ्यांना 1 कोटी 14 लाखाचे वाटप ; जाणून घ्या या योजनेच्या पात्रतेसह आवश्यक कागदपत्रे

Next Post

मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?

मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us