चाळीसगाव (प्रतिनिधी)- सहज जलबोध अभियाना अंतर्गत जल आराखडा तयार करणे कामी शिवनेरी फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी या गावी भेट दिली.
गाव शिवारला फेरी मारत असताना विहीर ची पाणी पातळी मोजणे तसेच माहिती संकलन करणे व पाझर तलाव त्याचबरोबर शिवारामध्ये असलेल्या गावातील नागरिकांना सहज जलबोध अभियाना संदर्भात माहिती महेंद्र पाटील सर,व राहुल राठोड सर यांनी दिली असता गावकर्यांनी त्यासंदर्भात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व माहिती संकलन साठी सुद्धा चांगला वेळ दिला. त्याप्रसंगी गावातील प्रशांत शेवरे, अविनाश अहिरराव, मनोज पाटील, इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.
















