पाचोरा,- शिक्षक दिना चे औचित्य साधून शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्या सोबत कनिष्ठ महाविद्यालय,पाचोरा येथील शिक्षकांनी
आज रोजी भुसावळ येथे सकारात्मक चर्चा केली.
एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा येथील शिक्षक प्रा प्रदीप देसले सर, प्रा नितीन पाटील सर, प्रा स्वप्निल ठाकरे सर, प्रा गौरव चौधरी सर, प्रा गिरीशचन्द्र पाटील सर यांनी विनाअनुदानित तुकडी वरील शिक्षक बांधवांच्या समस्या प्रचलित नियम, विनाअनुदानित सेवा सातत्य यात येणाऱ्या अडचणी,शालार्थ आयडी चा कॅम्प जळगाव मध्ये लावणे या संबंधित सकारात्मक चर्चा करण्यात आली.