Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे अनंतात विलीन

भारतीय लष्करातील 21 पॅराट्रूप स्पेशल फोर्समध्ये  कार्यरत होते शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे

najarkaid by najarkaid
October 31, 2020
in राष्ट्रीय
0
शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे अनंतात विलीन
ADVERTISEMENT

Spread the love

मालेगाव, दि. 31 :-  भारतीय लष्करातील 21 पॅराट्रूप स्पेशल फोर्समध्ये  कार्यरत असलेले शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे हे अरुणाचल प्रदेशात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना तेथील उंच प्रदेशातील प्रतिकूल वातावरणामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे यांच्यावर सायंकाळी 06:00 वाजता त्यांच्या मूळ गावी मानके पोस्ट चिखलओहोळ ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपमहापौर निलेश आहेर, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, यांच्यासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान मनोराज सोनवणे यांना श्रध्दांजली वाहिली.

सैन्यदलाचे दोन मेजर, एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर आणि बारा जवान यांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, तहसिलदार चंद्रजित राजपूत तर सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अविनाश रसाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

तालुक्यातील मानके या गावचे मूळ रहिवासी मनोराज सोनवणे  हे 16 वर्षापासून भारतीय लष्करातील 21 पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये कमांडो पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे, मुलगी तनू सोनवणे असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव मानके येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. शनिवारी मानके गाव व पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गावकऱ्यांनी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन शहीद जवानाला सायंकाळी  06:00 वाजता अखेरचा निरोप दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेता अनुपम खैर यांनी असं ट्विट का केलं असावं….

Next Post

एकनाथ खडसेंचे शिरपूर जातांना वाटेत राष्ट्रवादी पदाधिकारी व समर्थकांकडून जोरदार स्वागत

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
एकनाथ खडसेंचे शिरपूर जातांना वाटेत राष्ट्रवादी पदाधिकारी व समर्थकांकडून जोरदार स्वागत

एकनाथ खडसेंचे शिरपूर जातांना वाटेत राष्ट्रवादी पदाधिकारी व समर्थकांकडून जोरदार स्वागत

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us