जळगाव, (प्रतिनिधी) – सातत्य कायम राहणार या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन कृतज्ञता पूर्वक रस्त्याने प्रवास करणाऱ्या परप्रांतीय गरजूं दहा हजार नागरिकांना सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ जेवण,नाश्ता, चहा बिस्कीट, केळी, पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
शहरातील हायवे वरील प्रभात चौकातील शानबाग सभागृहात शासकीय कॅम्प सुरु आहे. या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने कृतज्ञता भावनेतून दररोज दहा हजार प्रवास करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना आहार सेवा लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे यांच्या पुढाकाराने देण्यात येत आहे.
कास्ट्राईब संघटनेची मदत

आज कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने या कॅम्प ला साडे आठ हजार रुपयेची रोख मदत जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांनी आयोजकांकडे दिली.
यांचे आहे सहकार्य
वाजिद फाऊंडेशन, क्रीडाई जळगांव ,आर. सी. बाफना ट्रस्ट जळगांव,योगेश पाटील नगरसेवक, लोकेश मराठे,अशोक पिंगळे, खादी भांडार, बाबा हरदासराम सेवा सिंधी मंडल, यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
याठिकाणी माजी नगरसेवक राजू मोरे, भरत कर्डीले, निवेदिता ताठे, महिला समुउपदेशक भारती म्हस्के शोभा हंडोरे हे पूर्ण वेळ परिश्रम घेत आहे.
प्रशासनाच्या वतीने जळगाव शहर मंडळ अधिकारि योगेश नन्नावरे, तलाठी रमेश वंजारी हे तळ ठोकून आहेत.