पुणे – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्ताकोंडीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून पर्यायी सरकार निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.