Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर अँड पीस’चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी-कोर्ट

najarkaid by najarkaid
August 29, 2019
in राष्ट्रीय
0
वॉर अँड पीस’चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी-कोर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई   – काल लिओ टॉल्सटाय यांच्या ’वॉर अँड पीस’ या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. बिस्वजीत रॉय यांच्या ’वॉर अँड पीस इन जंगलमहल’ या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला होता. टॉल्सटाय यांचे ’वॉर अँड पीस’ हे पुस्तक साहित्य क्षेत्रातील अजरामर व सुप्रसिद्ध पुस्तक असल्याचे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे, ते वेदनादायी आहे,’ असं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती सारंग कोतवाल यांनी स्पष्ट केलं. 

नक्षली संबंधावरून अटकेत असलेले आरोपी वर्नन गोन्साल्विस यांना कोर्टाने तुमच्या घरी ’वॉर अ‍ॅण्ड पीस’ कादंबरी का आहे? असं स्पष्टीकरण मागितल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. त्यावर न्यायामूर्ती सारंग कोतवाल यांनी प्रसारमाध्यमं आणि वकिलांसमोर हा खुलासा केला. टॉल्सटाय यांचे ’वॉर अँड पीस’ हे पुस्तक साहित्य क्षेत्रातील अजरामर व सुप्रसिद्ध पुस्तक असल्याचे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे, ते वेदनादायी आहे. काल ’वॉर अँड पीस’ पुस्तकाचा उल्लेख केला नव्हता. पोलिसांच्या दस्तावेजात ज्या पुस्तकांचा उल्लेख आहे त्यात बिस्वजीत रॉय यांच्या ’वॉर अँड पीस इन जंगलमहल’ या पुस्तकाचा समावेश आहे. त्याचा उल्लेख करण्यात आला होता. शिवाय वर्नन गोन्साल्विसकडून जप्त करण्यात आलेले साहित्य हे आक्षेपार्ह असल्याचे मी म्हटले नव्हते, असं न्यायामूर्तींनी सांगितलं.
तर ’वॉर अँड पीस’ या पुस्तकासंदर्भात गोन्साल्विस यांनीही कोर्टात युक्तिवाद केला. माझ्याकडे 2 हजार पुस्तकांचा संग्रह आहे आणि त्यापैकी पुणे पोलिसांनी माझ्या घरातून जप्त केलेल्या एकाही पुस्तकावर कायद्याने बंदी नाही. शिवाय कोणतेही व कोणत्याही प्रकारचे पुस्तक मी बाळगले असले तरी जोपर्यंत त्याचा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध असल्याचे पोलीस दाखवत नाहीत, तोपर्यंत ते पुस्तक माझ्याविरुद्ध पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद गोन्साल्विस यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

Next Post

पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us