Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवंगत आईस लिहलं पत्र… आईच्या आठवणींनी गहिवरले शरद पवार….

najarkaid live by najarkaid live
November 14, 2020
in राष्ट्रीय
0
दिवंगत आईस लिहलं पत्र… आईच्या आठवणींनी गहिवरले शरद पवार….
ADVERTISEMENT

Spread the love

राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणून ज्यांना ओळखलं जातं राज्यासह देशात त्यांना राजकारणातील ‘चाणक्य’ संबोधलं जातं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आईच्या आठवणींनी गहिवरून आलं आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्या आई शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मिळालेल्या प्रेरणेच्या बळावर खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू मिळाल्याचा उल्लेख करत दिवंगत आईस पत्र लिहलं आहे. तसं शरद पवार यांनी ते पत्र आपल्या ट्विटर हॅन्डल वरून शेअर देखील केलं आहे.

शरद पवार आपल्या आईला ‘बाई ‘ या नावानं हाक मारायचे. त्याच नावानं बाईंना पत्र लिहत साद घातली असून पत्रात म्हटलं आहे की,

प्रिय सौ.बाई

साष्टांग नमस्कार,

पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ  राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढवळून निघाले होते लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही पक्ष अडचणीत असतांना  काही जवळचे काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यातच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा मोठे आव्हान उभे राहिले, पण तुम्ही मला हार न मानता खचून न जाता झुंजण्याचा बाळकडू दिले आहे. मग खचून जाण्याचा  प्रश्नच नव्हता.

मला चांगल आठवतं. बैलांना मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक  कामात देखील झोकून दिलं. या प्रेरणेच्या बळावर मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढला.

हे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर  घेतलं मला नवा उत्साह मिळाला,  मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं.  नवं सरकार जेव्हा शपथ घेत होतं तेव्हा माझ्या पहिल्यावहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होतं.

राजकीय धामधुमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट ओढवलं.  त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय.

बाई तुमच्यात उपजत नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना 1935 साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डवर  निवडून गेलेत. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्ह मुलं कडेवर घेऊन खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायचात.  कळत नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.

बाई तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती. मी मात्र गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारे कडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडून मिळाली.

माझ्या पंच्याहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी माननीय राष्ट्रपती आजी, माजी  प्रधानमंत्र्यांचे भारतातील सर्व पक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व  सोहळा अशा सुसंवाद राखण्याचा संस्काराचे फलित आहे असे मी मानतो. त्या सत्कार प्रसंगी तुमची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर दिसत होती.

बाई कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत सामान्यांसाठी अखंड काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वतःच्या आवडी निवडी नुसार निवडू निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठाऊक आहे. आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही आमचे सवंगडी कोण आहेत आणि कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो हे तुम्ही कटाक्षाने पाहायचे.  आम्हा भावंडांसाठी तुम्ही घेतलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे.

सर्वात थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले, आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतलेल्या अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली.बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तिथे नोकरी करत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले सूर्यकांत रावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. प्रताप इंजिनियर तर झालाच परंतु त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात देखील लौकिक मिळवला आहे.

बाई तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिले. त्या आपल्या संसारात भक्कमपणे उभे राहिले आहेत तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं पण आम्हा भावंडांची तुमच्या बद्दल तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं पण मी राज्याच्या मुख्यमंत्री शपथ घेताना तुम्ही नव्हतात. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री  मिळाली तेव्हाही तुम्ही  नव्हतात.  भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळीही पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहर्‍यावर लवलेश दाखवत नसलो तरी  तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते. मनात गहिवर आणते.

बाई आज तुमची नातवंड देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला आम्हा भावंडां नातवंडांकडे  पाहून खूप खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की.

दिवाळीत सर्व कुटुंबीयांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र तुमची खूप उणीव भासते अधिक काही लिहीत नाही आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.

तुमचा शरद

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सीमेवर भारत -पाक सैन्याच्या चकमकीत कोल्हापूरचा सुपुत्र शहिद

Next Post

पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना मिळाली संधी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना मिळाली संधी

पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us