गडहिंग्लज : लग्नाला एक दिवस बाकी असताना वधूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज याठिकाणी घडलीय. संजना श्रीनिवास वेर्णेकर असं मृत पावलेल्या 27 वर्षीय वधुचं नाव असून यामुळे कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. तर गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेत.
संजना श्रीनिवास वेर्णेकर गडहिंग्लज येथील संकेश्वर रोड परिसरात वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी संजना हीचा विवाह ठरला होता. त्यामुळे घरात लगीनघाई सुरू होती. अशात गुरुवारी सकाळी कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गुरुवारी सकाळी संजना पाणी आणण्यासाठी गेली असता, ती पाण्याच्या टाकीत पडली. पाण्यासाठी गेलेली संजना बराच वेळ झालं तरही परत आली नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली.
यावेळी पाण्याच्या टाकीत संजनाचा मृतदेह आढळून आला आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. लग्नाच्या एक दिवस आधीच वधुसोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबानं भल्या सकाळी एकच आक्रोश केला आहे. भावी वधुच्या मृत्यूची माहिती समोर येताच वराकडील मंडळींना देखील धक्का बसला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, वधुचा अशाप्रकारे अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा :
पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल
मनमाड नजीक रेल्वेचा मेगाब्लॉक, अनेक रेल्वेगाड्या रद्द, जाणून घ्या सविस्तर
देशभरात Airtel ची सेवा डाउन, वापरकर्त्यांना इंटरनेट चालवण्यात त्रास
सेक्स खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा; समंथाच्या विधानावर तहलका
या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विश्वनाथ रायकर यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. हा निव्वळ अपघात आहे की घातपात? त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
















