- रुईखेडा – चांगदेव गटात रोहिणीताई खडसे यांच्या प्रचार दौर्याला उदंड प्रतिसाद

मुक्ताईनगर – आ.एकनाथराव खडसे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावा – गावात बौद्ध विहार तर दिलेच शिवाय दलित वस्ती अंतर्गत रस्त्यासह मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. गेल्या तीस वर्षात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे सर्वमान्य, लोकमान्य असे नेतृत्व नाथाभाऊ चे आहे. गेल्या तीस वर्षात मतदार संघात कुठेही जातीय दंगली नाहीत, की दोन समाजात कुठेही तेढ नाही, असेच सामाजिक ऐक्य यापुढे ही कायम ठेवण्यासाठी भाजपा सेना महायुती च्या उमेदवार अॅड. सौ रोहिणीताई यांच्या पाठीशी संपूर्ण समाज भक्कम पणे उभा आहे. येत्या 21रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून नाथाभाऊचे हात बळकट करण्यासाठी रोहिणीताईंना प्रचंड मतांनी विजयी करावे, रोहिणीताईच भावी आमदार असतील, अशी खात्री रिपाई चे तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांनी दिली.
सौ रोहिणीताई खडसे यांच्या रुईखेडा -चांगदेव जि प गटात आयोजित प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रोहिणीताई या कार्यक्षम असून त्यांनी गेल्या 3/4वर्षात त्यांची प्रशासनावरील, सहकारा वरील पकड घट्ट असल्याचे त्यांच्या नेतृत्व शैली ने सिद्ध करून दाखवले आहे. जिल्हा बँकेला सोनेरी दिवस आणण्यात सौ रोहिणीताईंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय सूत गिरणी व साखर कारखान्याच्या माध्यमातून हजाराहुन अधिक बेरोजगाराना रोजगार दिला आहे. निश्चितच ताई भविष्यात मतदार संघात विकास गंगा आणून चेहरा मोहरा बदलवतील यात शंका नाही, म्हणूनच भावी आमदार म्हणून सौ रोहिणीताई यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन श्री हिरोळे यांनी केले.
यावेळी रोहिणीताईंनी मतदार महिला पुरुषांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विकासकामे करताना नाथाभाऊंनी आपला परका असा भेद मानला नाही. संपूर्ण मतदारसंघातील गावांच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून त्याप्रमाणेच कार्य केले. आज मला मत म्हणजेच नाथाभाऊंना मत दिल्यासारखे आहे. 21 तारखेला मला आपला आशिर्वाद द्या. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी रोहिणीताईंचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.
प्रचार दौऱ्यात मानेगाव, चांगदेव, चिंचोल, मेहुण, कासारखेडा, वढवा, सारोळा, माळेगाव, हरताळा,कुंड, घोडसगाव, चिखली, सातोड, रुईखेडा, पिंप्रि आकराऊत या गावात जाऊन प्रचार केला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ धायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेशभाऊ ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथभाऊ कांडेलकर,प स सभापती प्रल्हादभाऊ जंगले,रासप चे जिल्हाध्यक्ष रविभाऊ पवार,जि प सदस्य निलेश पाटील, प. स. सदस्या सुवर्णाताई साळुंखे, विकास पाटील,गट प्रमुख सुनिल भाऊ काटे, चंद्रकांतभाऊ भोलाने, समाधान कार्ले, विजय भंगाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश चौधरी, सुभाष खाटिक,राजेंद्र कांडेलकर,राजेंद्र पाटील, कैलास कोळी,रामभाऊ पाटील, कैलास पाटील, उसामा रउफ खान, दीपक साळुंखे, भास्कर लवांडे, भारत घोळके, कैलास डहाके, अश्विन घोगरे ,प्रवीण डहाके, रवींद्र बेलदार, दिनकर सुरवाडे,विनोद काटे, प्रकाश साळुंखे, प्रवीण शिर्के, मांगो पाटील, अनिल काटे, रतन कोळी रघुनाथ चौधरी, मोहन चौधरी, राजू चौधरी, जिवराम चौधरी, भास्कर इंगळे, रामदास इंगळे, अजय सुरळके, मुकेश डीवर, विश्वनाथ सूर्यवंशी रउफ खान, राजकुमार डीवर,विकास पाटील, कैलास डीवर, लीलाधर माळी अशोक पाटील, आक्रोश भिल, जनार्धन निकम, भिका गोपाळ, पवन पाटील , दीपक साळुंखे,बाळाभाऊ सोनवणे,शेषराव पाटील,नंदू भाऊ हिरोळे,निलेश खोसे, युनुस पिंजारी, सुभाष माळी, शंकर माळी, प्रल्हाद पाटील, उमेश पाटील, गोविंद गवळी, राजू परसोडे,अतुल बढे, चंद्रशेखर बढे, प्रेमचंद बढे, वासुदेव बढे, विलास नारखेडे, हबीब वंजारी आदिंसह भाजपा, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.















