Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; कोठडीची मागणी

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in राष्ट्रीय
0
रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; कोठडीची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणात त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असं सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली हायकोर्टात सांगितलं. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरित्या थेट संबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं.
रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये १२ ब्रायनस्टन स्क्वेअरस्थित १७ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदीमध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं वाड्रा यांना अंतरिम जामीन दिला होता. या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. रॉबर्ट वाड्रा यांना कोठडी देण्यात यावी. कारण त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक देवाण-घेवाणीत ज्या बाबी समोर येत आहेत, त्यांच्याशी वाड्रा यांचा कथित संबंध आहेत, असं ईडीचं म्हणणं आहे. याशिवाय वाड्रा हे मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला सहकार्य करत नाहीत, असंही ईडीनं हायकोर्टात सांगितलं.

वाड्राच्या वकिलांनी ईडीनं केलेल्या दाव्याचं खंडन केलं आहे. यंत्रणेनं जेव्हा कधी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावलं आहे, त्या-त्या वेळी ते हजर झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी चौकशीला संपूर्ण सहकार्य केलेले आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना वाड्रा यांनी उत्तरं दिली आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप न स्वीकारणं या अर्थ ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा होत नाही, अशी बाजूही वकिलांनी मांडली. दरम्यान, दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी हायकोर्टानं अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं वाड्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला ईडीनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलासा दिला होता. वैद्यकीय उपचारांकरिता सहा आठवड्यांसाठी विदेशात जाण्यास त्यांना न्यायालयानं परवानगी दिली होती. वाड्रा यांना न्यायालयानं उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडला जाण्याची परवानगी दिली होती. सहा आठवड्यांसाठी त्यांना विदेशात जाता येणार होतं. त्याचवेळी ईडीनं त्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. लंडनमध्ये वाड्रांची मालमत्ता आहे. त्यामुळं ईडीनं गेल्या सुनावणीवेळी त्यांना लंडनमध्ये जाण्यास विरोध केला होता. त्यांना लंडनलाच का जायचं आहे, असा प्रश्न ईडीनं उपस्थित केला होता. त्यावर तिथेच योग्य उपचार मिळतील, अन्यथा तुम्ही ठिकाण सांगा, तिथे जाईल असं वाड्रा म्हणाले होते. अमेरिका आणि नेदरलँड असे पर्यायही वाड्रांनी दिले होते. न्यायालयानं मात्र, त्यांना उपचारासाठी या दोन्ही देशांत जाण्याची परवानगी दिली होती. तत्पूर्वी, विदेशात जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या वाड्रांच्या याचिकेवरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. आजाराचं कारण देत उपचारांसाठी लंडन किंवा इतर देशांत जाण्याची परवानगी वाड्रांनी मागितली होती. त्याला ईडीनं विरोध दर्शवला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रउभारणीसाठी कार्यरत शिक्षकांचा रोटरीतर्फे आयुक्तांच्या हस्ते सत्कार

Next Post

अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट

अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us